३५८ तालुक्यांत सेवा सुविधा सुरू; बांधकाम कामगारांसाठी शासनाचा मोठा दिलासा
देशातील नागरिकांसाठी आधार (UID) संदर्भात एक महत्त्वाची सूचना समोर आली असून, आधार कार्ड अपडेट करण्याबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आधार कार्ड अपडेट किंवा नवीन आधार कार्ड काढताना जन्म प्रमाणपत्र आणि विवाह प्रमाणपत्र ही कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची ठरत असल्याने नागरिकांनी ती सुरक्षित ठेवण्याचे सांगितले आहे. जन्म किंवा लग्नाच्या वेळी ही नोंद स्थानिक कार्यालयात करून प्रमाणपत्र मिळवून ठेवणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, १० ते १५ वर्षांहून जुनी किंवा पूर्णपणे अपडेट न केलेली आधार कार्डे बंद करण्याचा निर्णय आधार प्राधिकरणाने घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अनेक जुन्या आधार कार्डधारकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जवळच्या अधिकृत आधार सेवा केंद्रावर जाऊन फोटो (फेस), बोटांचे ठसे (फिंगरप्रिंट), डोळ्यांची माहिती (आयरिस) आणि मोबाईल क्रमांक यांसह आवश्यक तपशील त्वरित अपडेट करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आपल्या आधार कार्डवरील नावाची स्पेलिंग, जन्मतारीख व इतर माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. चुकीची माहिती असल्यास ती लवकरात लवकर दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे, अन्यथा पुढील शैक्षणिक व शासकीय कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.
यामुळे नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी वेळेत आधार कार्ड अपडेट करून भविष्यातील गैरसोयी टाळाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.
