Take a fresh look at your lifestyle.

शासन निर्णय: जमीन व्यवहार सुलभ करण्यासाठी महसूल विभागाची विशेष मोहीम

0

राज्यातील शेतीजमिनींवर एकाहून अधिक सहधारक असलेल्या प्रकरणांमध्ये हिस्सेवाटप सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ८५ अन्वये ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे महसूल व वन विभागाने शासन परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

कलम_85_नुसार_विभाजन_बाबत_मोहीम_राबविणेबाबत_18_02_2026 (1)

वरील लिंक ला क्लिक करा व GR वाचा 👆

राज्यात AgriStack अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) साठी जमिनीची अचूक नोंद आवश्यक आहे. मात्र, अनेक ठिकाणी सामाईक खात्यात जमीन असली तरी प्रत्येक सहधारकाच्या नावावर त्याचा स्वतंत्र हिस्सा नोंदलेला नसल्यामुळे फेरफार नोंदी, जमीन खरेदी-विक्री व्यवहार, तसेच पीक पाहणी नोंदणीमध्ये अडचणी येत आहेत.

ही अडचण दूर करण्यासाठी तालुका व मंडळ स्तरावर विशेष कॅम्प आयोजित करून सहधारकांच्या जमिनींचे हिस्सेवाटप करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक राहणार असून प्रशासनाकडून जनजागृती व प्रचारही करण्यात येणार आहे.

या मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंद अचूक होऊन Farmer ID तयार करणे सुलभ होणार असून जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास महसूल विभागाने व्यक्त केला आहे.