Take a fresh look at your lifestyle.

गट-ब, क व ड भरती प्रक्रियेत बदल; शासनाच्या मार्गदर्शक सूचनांत सुधारणा

0

राज्य शासनाने गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील सरळसेवा भरती प्रक्रियेतील निवडसूचीच्या कालमर्यादेबाबत महत्त्वाची सुधारणा केली आहे. दिनांक ४ मे २०२२ रोजी जारी करण्यात आलेल्या एकत्रित मार्गदर्शक सूचनांमध्ये सामान्य प्रशासन विभागाने २ डिसेंबर २०२५ रोजी सुधारणा करून नव्या तरतुदीचा समावेश केला आहे.

सुधारित तरतुदीनुसार, निवड समितीने तयार केलेली निवडसूची दोन वर्षांसाठी किंवा नवीन भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत (यापैकी जो दिवस आधी येईल तोपर्यंत) वैध राहील. मात्र ही मुदतवाढ फक्त त्या पदांपुरतीच लागू असेल, जी पदे निवडसूची तयार करताना विचारात घेण्यात आली होती.

तसेच, २ डिसेंबर २०२५ रोजी ज्या निवडसूचींना दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला नाही आणि ज्या पदांची भरती अद्याप पूर्ण झालेली नाही, अशा निवडसूचींनाच ही सुधारणा लागू राहणार आहे.

४ मे २०२२ च्या शासन निर्णयातील इतर सर्व मार्गदर्शक सूचना यापूर्वीप्रमाणेच कायम राहतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

राज्य शासनाने गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील सरळसेवा भरती प्रक्रियेतील निवडसूचीच्या कालमर्यादेबाबत महत्त्वाची सुधारणा केली आहे. दिनांक ४ मे २०२२ रोजी जारी करण्यात आलेल्या एकत्रित मार्गदर्शक सूचनांमध्ये सामान्य प्रशासन विभागाने २ डिसेंबर २०२५ रोजी सुधारणा करून नव्या तरतुदीचा समावेश केला आहे.

सुधारित तरतुदीनुसार, निवड समितीने तयार केलेली निवडसूची दोन वर्षांसाठी किंवा नवीन भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत (यापैकी जो दिवस आधी येईल तोपर्यंत) वैध राहील. मात्र ही मुदतवाढ फक्त त्या पदांपुरतीच लागू असेल, जी पदे निवडसूची तयार करताना विचारात घेण्यात आली होती.

तसेच, २ डिसेंबर २०२५ रोजी ज्या निवडसूचींना दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला नाही आणि ज्या पदांची भरती अद्याप पूर्ण झालेली नाही, अशा निवडसूचींनाच ही सुधारणा लागू राहणार आहे.

5_6055412349827816446

वरील लिंक ला क्लिक करा व सविस्तर वाचा 👆