Take a fresh look at your lifestyle.

देशात पहिलीच नोंद: केरळचा ‘राज्य सूक्ष्मजीव’ घोषित करण्याचा निर्णय

0

केरळने ‘राज्य सूक्ष्मजीव’ घोषित करणारे भारतातील पहिले राज्य ठरत नवी ओळख निर्माण केली आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ‘बॅसिलस सबटिलिस’ या जिवाणूची राज्याच्या अधिकृत सूक्ष्मजीव म्हणून घोषणा केली.

‘बॅसिलस सबटिलिस’ हा उष्णता-प्रतिरोधक व निरोगी जिवाणू असून तो प्रोबायोटिक म्हणून कार्य करतो. हा जिवाणू प्रामुख्याने माती, पाणी तसेच मानवी आतड्यात आढळतो.

या निवडीमागील मुख्य उद्देश म्हणजे आरोग्य व कृषी क्षेत्रात सूक्ष्मजीवांची सकारात्मक आणि उपयुक्त भूमिका अधोरेखित करणे तसेच जनजागृती वाढवणे हा आहे. केरळच्या या निर्णयामुळे विज्ञाननिष्ठ उपक्रमांना चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.