Take a fresh look at your lifestyle.

शासनाचा निर्णय : निवृत्तिवेतनधारकांच्या खात्यात वाढीव रक्कम

0

राज्य शासनाने राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना मोठा दिलासा देत महागाई वाढीचा दर ५५ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू राहील.

सुधारित महागाई वाढ १ फेब्रुवारी २०२६ पासून रोखीने अदा करण्यात येणार असून, जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकी मार्च २०२६ मध्ये दिली जाणार आहे. उर्वरित थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येतील.

महागाई वाढीची रक्कम परिगणना करण्याची जबाबदारी अधिदान व लेखा अधिकारी/कोषागार अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तसेच अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी व कृषितर विद्यापीठे, अशासकीय महाविद्यालये तसेच जिल्हा परिषदांच्या निवृत्तिवेतनधारकांनाही हा निर्णय लागू राहणार आहे.

file

वरील लिंक ला क्लिक करा व सविस्तर GR वाचा👆