Take a fresh look at your lifestyle.

आधार लिंकिंग आणि आधार सीडिंग म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

0

आधार कार्ड बँक खात्याशी जोडताना “आधार लिंकिंग” आणि “आधार सीडिंग” या दोन संज्ञा वापरल्या जातात. मात्र दोन्हीमध्ये महत्त्वाचा फरक आहे.

🔹आधार लिंकिंग (Aadhaar Linking)

बँक खात्यासोबत आधार जोडणे.

KYC (ओळख पडताळणी) पूर्ण करण्यासाठी उपयोग.

खाते सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक.

एकापेक्षा जास्त खात्यांना आधार लिंक करता येतो.

🔹 आधार सीडिंग (Aadhaar Seeding)

सरकारी योजनांचे (DBT) पैसे मिळण्यासाठी आधार खात्याशी जोडणे.

सबसिडी, पेन्शन, शासकीय अनुदान थेट खात्यात जमा होते.

फक्त एका प्राथमिक खात्याशीच सीडिंग करता येते.

थोडक्यात: लिंकिंग म्हणजे ओळख पडताळणीसाठी आधार जोडणे, तर सीडिंग म्हणजे शासकीय लाभ थेट खात्यात मिळण्यासाठी आधार सक्रिय करणे.