सैनिक कल्याण विभाग(गट-क) पदभरतीसाठी मुदतवाढ
सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत लिपिक टंकलेखक (गट-क) सरळसेवेतील पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत अंतिम मुदत ९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
याबाबतची जाहिरात १२ ऑक्टोबर २०२५ रोजी, तर शुद्धिपत्रक ७ डिसेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आले होते. तांत्रिक कारणास्तव सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ २६ डिसेंबर २०२५ पासून निष्क्रीय झाल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.
उमेदवारांनी https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32786/96173/Index.html Web Link चा वापर करून ऑनलाईन अर्ज भरावा.
