Take a fresh look at your lifestyle.

भारत निवडणूक आयोगाचे सर्व नागरिकांना ‘ECINet’ बाबत सूचना नोंदविण्याचे आवाहन!

0

भारत निवडणूक आयोगाने सर्व नागरिकांना ECINet हे नवीन एकात्मिक ॲप डाउनलोड करण्याचे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या मौल्यवान सूचना १० जानेवारी पर्यंत देण्याचे आवाहन केले आहे. वापरकर्ता नागरिक ॲपमधील ‘Submit a Suggestion’ या पर्यायाद्वारे आपल्या सूचना नोंदवू शकतात.

ECINet हे एकाच ठिकाणी विविध निवडणूक-संबंधित सुविधा उपलब्ध करणारे एकात्मिक ॲप आहे. यामध्ये Voter Helpline App, cVIGIL, Saksham, Voter Turnout App, Know Your Candidate आदींसह एकूण ४० स्वतंत्र ॲप्लिकेशन्स आणि संकेतस्थळांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे.

सविस्तर वृत्त- https://mahasamvad.in/187372/