बांधकाम कामगार नोंदणी सुरू: नोंदणी करा आणि शासकीय योजनांचा लाभ घ्या…
भारतामध्ये बांधकाम क्षेत्र हा रोजगार देणारा मोठा उद्योग आहे. मजूर, कामगार, इमारत उभारणी करणारे कारागीर, विटा-गारा टाकणारे, पेंटर, सुतार, लोखंडी काम करणारे असे हजारो कामगार रोज या क्षेत्रात श्रम करत असतात. या कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि शासकीय योजना मिळाव्यात म्हणून बांधकाम कामगार नोंदणी आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासनाने 1996 च्या “इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवा अटी) अधिनियम” नुसार बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून कामगारांची नोंदणी करून त्यांना आरोग्य, शिक्षण, आर्थिक सहाय्य आणि सामाजिक सुरक्षा दिली जाते.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
1. कामगाराचा आधार कार्ड / मतदान ओळखपत्र
2. रहिवासी दाखला (राशन कार्ड / पत्त्याचा पुरावा)
3. जन्मतारीख प्रमाणपत्र (जन्म नोंद, शाळा सोडल्याचा दाखला)
4. पासपोर्ट साईज फोटो
5. काम केले असल्याचा पुरावा – नियोक्त्याचे प्रमाणपत्र/ठेकेदाराचे प्रमाणपत्र
6. बँक खाते पासबुकची प्रत
बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रिया
१. अर्ज सादर करणे: कामगाराने जवळच्या तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रात अर्ज भरावा. अर्ज ऑनलाइन पद्धतीनेही भरता येतो.
