Take a fresh look at your lifestyle.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या ‘संधीची समानता’ या तत्त्वाच्या प्रेरणेने राज्य शासनाचा ‘१ टक्का ‘अनाथ आरक्षणा’ चा निर्णय

0

अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय हा माझ्या जीवनातील सर्वात समाधान देणारा निर्णय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शासकीय सेवेत रुजू झालेल्या अनाथ युवक-युवतींशी आज वर्षा शासकीय निवासस्थानी संवाद साधला. कार्यक्रमास विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय व लाभार्थी अनाथ युवक युवती उपस्थित होते.

संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या ‘संधीची समानता’ या तत्त्वाच्या प्रेरणेने राज्य शासनाने ‘१ टक्का अनाथ आरक्षणा’चा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ८६२ अनाथ युवक-युवती स्वावलंबी होऊन समाजासाठी कार्यरत होणार असल्याचा अभिमान वाटतो तसेच शासनाच्या वर्षपूर्तीची सुरुवात सुंदर कार्यक्रमाने झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.

आपण जे काही साध्य करतो, ते समाजाने निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे शक्य होते. शाळा, संस्था, शासन, उद्योग हे सर्व समाजाच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. त्यामुळे या समाजाला परत काहीतरी देणे, हा प्रत्येकाचा धर्म आहे. संघर्षातून पुढे आलेले हे युवक समाजात ‘रोल मॉडेल’ बनावेत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आज मलाही वर्ष झाले. या वर्षपूर्तीची सुरुवात अतिशय सुंदर कार्यक्रमाने झाली. निःशब्द भाव खूप बोलणारा असतो, तसा भाव आज माझ्या मनात आहे. शासनात अनेक निर्णय घेतले जातात, अनेक कामे केली जातात, पण काही निर्णय मनाला गहिवर देतात. तसाच अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय आहे. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस