राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ‘कोरडवाहू क्षेत्र विकास योजना’…
प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबवली जाते. कोरडवाहू क्षेत्र विकास योजना २०१४-१५ पासून सुरू असून, २०२२-२३ पासून ती राष्ट्रीय कृषी विकास योजनेत समाविष्ट झाली आहे.
कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे – शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करणे आणि एकात्मिक शेती पद्धतीला प्रोत्साहन देणे.
योजनेची मुख्य उद्दिष्टे
1. कोरडवाहू शेती क्षेत्रात नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करणे.
2. पावसाचे पाणी साठवून त्याचा कार्यक्षम वापर वाढवणे.
3. पिक विविधीकरण, फळबाग, पशुपालन, मत्स्यपालन,मधुमक्षिकापालन यांसारखे पूरक उपक्रम राबवणे.
4. शाश्वत शेतीसाठी स्थानिक पिके, फळझाडे आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे.
5. हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवणे.
योजनेतून मिळणारे फायदे
• पिक विविधतेमुळे हवामान बदलाचा कमी परिणाम.
• पूरक व्यवसायांमुळे शेतीव्यतिरिक्त अतिरिक्त उत्पन्न.
• सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचे आरोग्य सुधारते.
जलसंधारणामुळे पाण्याची उपलब्धता वाढते.
• शाश्वत शेतीद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दीर्घकाळ टिकाऊ बनते.
कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कृषी सहाय्यक / ग्रामसेवक यांच्याकडे संपर्क करावा.