दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना…
दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे. इच्छुक दिव्यांग व्यक्तींनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी. मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई – ७१ येथे संपर्क साधावा. योजनांचे अर्ज कार्यालयात उपलब्ध असल्याचेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
