युवक–युवतींनी अधिकारी पदासाठी मोफत प्रशिक्षण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन!
भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदासाठी होणाऱ्या सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात एसएसबी कोर्स क्रमांक ६४ आयोजित करण्यात आला आहे. हा कोर्स १५ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत होणार असून प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास व भोजनाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. इच्छुक युवक–युवतींनी या मोफत प्रशिक्षण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/184686/