Take a fresh look at your lifestyle.

आपले सरकार पोर्टल व मोबाईल ॲपद्वारे नागरिकांना मिळणार ‘या’ सुविधा!

0

नागरिकांना अधिसूचित सेवा निर्धारित वेळेत न मिळाल्यास, संबंधित जवाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते — आणि त्यांना ₹5,000 पर्यंत दंड देखील ठोठावला जाऊ शकतो. ⚖️

महाराष्ट्र शासनाच्या “लोक सेवा अधिनियम” अंतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवा निश्चित कालमर्यादेत मिळण्याचा कायदेशीर अधिकार देण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे प्रशासनिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांचा शासनावर विश्वास वाढविण्याचा उद्देश साधला जात आहे.

“प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्काची सेवा वेळेवर मिळाली पाहिजे — हेच सुशासनाचे खरे प्रतिक आहे,” – जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे.

आपले_सरकार पोर्टल व मोबाईल ॲपद्वारे नागरिक खालील सुविधा घेऊ शकतात —

✅ घरबसल्या शासकीय सेवा अर्ज सादर करणे

✅ अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन पाहणे

✅ सेवाप्राप्ती विलंब झाल्यास तक्रार दाखल करणे

✅ सेवांच्या वेळापत्रकासह पारदर्शक यंत्रणा

🌐 www.aaplesarkar.mahaonline.gov.in

वर आपले खाते तयार करून आपण आपल्या शासकीय सेवांचा लाभ सहज घेऊ शकता.

“वेळेत सेवा – नागरिकांचा अधिकार; पारदर्शक प्रशासन – आपले सरकारचा संकल्प!”