स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कहाणी; प्रियंका सरोदे यांचे MPSC परीक्षेत दैदीप्यमान यश…
रावेर तालुक्यातील रोझोदा येथील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील डाळींबी उर्फ प्रियंका रवींद्र सरोदे या तरूणीने एमपीएससीच्या राज्यसेवा परिक्षेत राज्यातून ओबीसी प्रवर्गातून सोळाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याची कामगिरी पार पाडली आहे. या देदीप्यमान यशाबाबत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
तहसील कार्यालय रावेर येथे पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक पदावर कार्यरत कु. डाळिंबी सरोदे मॅडम यांची MPSC मार्फत अधिकारी वर्ग- 1 पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन…
आपणास बी.एम. फाउंडेशन तर्फे मनपूर्वक शुभेच्छा!
त्यांनी कार्यालयीन कामकाज व्यवस्थितरीत्या सांभाळून आपण मिळवलेले यश इतरांना नक्कीच प्रेरणादायी आहे.
-योगेश नन्नवरे संस्थापक- बी.एम. फाउंडेशन, इंडिया
