Take a fresh look at your lifestyle.

महिला खेळाडूंसाठी शासनाचा महत्वपूर्ण निर्णय!

0

राज्यातील महिला खेळाडूंसाठी शासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्टस् क्लब, जिमखाना, स्टेडियम तसेच स्थानिक क्रीडांगणांवर स्वतंत्र, स्वच्छ आणि सुरक्षा-सुसज्ज चेंजिंग रूमची सुविधा महिला खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी काही दिवसांपूर्वी दादर जिमखान्याच्या नूतनीकरण उद्घाटनप्रसंगी महिलांना क्रीडांगणावर सुरक्षित व आदरयुक्त वातावरण मिळालेच पाहिजे, त्यासाठी देशभरातील क्रीडा संकुलात महिलांना चेंजिंग रुमची सुविधा उपलब्ध करून देण्याबद्दल आवाहनाला केले होते. या आवाहनाला तात्काळ व सकारात्मक प्रतिसाद देणारे क्रीडा मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे हे देशातील पहिले मंत्री ठरले आहेत.