Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल; जाणून घ्या नवीन नियम…

0

भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून कोणत्याही ट्रेनच्या जनरल तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम लागू होणार आहे. या निर्णयामुळे तिकीट बुकिंगमध्ये अधिक पारदर्शकता येईल.

तसेच दलाल व एजंट्सच्या मनमानीला आळा बसेल ज्यामुळे सामान्य प्रवाशांना सीट मिळण्याची अधिक संधी मिळेल.नवीन नियमानुसार कोणत्याही ट्रेनचे तिकीट बुकिंग सुरू झाल्यावर सुरुवातीच्या 15 मिनिटांसाठी फक्त आधार-प्रमाणित युजर्सच आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा ॲपवरून तिकीट बुक करू शकतील.

ज्यांच्याकडे आधार प्रमाणीकरण नाही, त्यांना या महत्त्वपूर्ण 15 मिनिटांच्या वेळेत बुकिंग करता येणार नाही. उदाहरणार्थ जर 15 नोव्हेंबरच्या प्रवासासाठी तिकीट बुकिंग 16 सप्टेंबर रोजी रात्री 12:20 वाजता सुरू झाले, तर रात्री 12:35 वाजेपर्यंत केवळ आधार-सत्यापित खात्यातूनच तिकीट बुक करता येईल.

सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात ट्रेनच्या तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या काळात सामान्य बुकिंगमध्येही ‘तत्काळ बुकिंग’ सारखीच गर्दी होते. या नवीन आधार-आधारित नियमामुळे बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक होऊन, व्यस्त वेळेतील गैरव्यवहार थांबवण्यास मदत होईल.