आपले ‘ITR Refund’ मिळाले का नाही? तपासण्याची सोपी ऑनलाईन प्रोसेस!
ITR Refund म्हणजे काय? तुम्ही जास्त Tax भरला असेल आणि Final Calculation नुसार Refund मिळतो. तो Refund थेट तुमच्या Bank Account मध्ये येतो.
Refund मिळायला किती वेळ लागतो?
▪️ ITR फाइल करून E-Verification पूर्ण झाल्यानंतरच Refund Process सुरू होते.
▪️ साधारण 7 ते 21 Working Days लागतात Process सुरू व्हायला.
▪️ पैसे Bank Account मध्ये येण्यासाठी साधारण 4 ते 5 आठवडे लागू शकतात.
Refund उशीर होण्याची कारणं:
▪️ बँक खात्याची माहिती चुकीची दिली असेल
▪️ E-Verification केलेलं नसेल
▪️ Form भरताना काही Errors असतील
कधी कधी IT Department तुमच्या Email वर Error Message पाठवतो – तो तपासा
Refund कसा मिळतो?
1️⃣ ITR फाइल करा
2️⃣ E-Verification करा
3️⃣ IT Department तुमचा Return Process करतो
4️⃣ सर्व काही बरोबर असेल तर Refund थेट Bank Account मध्ये जमा होतो

Refund Status Online तपासण्याची Step-by-Step Process
▪️ eportal.incometax.gov.in या वेबसाईटवर जा
▪️ User ID व Password टाकून Login करा
▪️ “E-File” टॅबवर जा → “Income Tax Returns” → View Filed Returns
▪️ तिथे तुमच्या सर्व Returns दिसतील
▪️ View Details क्लिक करून Refund Status पाहू शकता
जर Refund 4-5 आठवड्यांत आला नाही तर:
▪️ वेबसाईटवर Status Check करा
▪️ Email वर IT Department कडून आलेले मेसेजेस तपासा