नागरिकांनो, ‘सेवा पंधरवडा’ निमित्त महसूल विभागाचे विशेष उपक्रम
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५
जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने महसूल विभाग सेवा पंधरवड्यात नागरिकांना थेट दिलासा देण्यासाठी खालील महत्त्वाची कामे हाती घेणार आहे :
थकबाकी मुक्ती मोहीम
➡ १३ सप्टेंबर रोजी लोकअदालतीत थकबाकी प्रकरणे निकाली काढली जाणार.
जीवंत ७/१२
➡ मृत व्यक्तींची नावे वगळणे
➡ वारसांची नोंदणी व स्त्रियांचे समसमान हक्क नोंदवणे
➡ सर्व प्रकरणे २ ऑक्टोबरपूर्वी निकाली
जीवंत रेशनकार्ड
➡ मृत व अपात्रांची नावे वगळणे
➡ अपंग, आदिवासी व वंचित घटकांचा समावेश करणे
शेत सुलभ योजना (तुकडेबंदी कायदा, १९४७)
➡ सर्व प्रकरणांची तपासणी करून ७/१२ अद्ययावत करणे

पाणंद रस्त्यांची नोंद
➡ गावातील पायवाटे/रस्त्यांची नोंदणी
➡ ग्रामसभेत सामाजिक लेखापरीक्षण
दफनभूमी/श्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवणे
छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबिर
➡ प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिरे आयोजित
शेतकरी आत्महत्या पीडित कुटुंबे
➡ पेन्शन, आर्थिक सहाय्य व शासन योजनांचा लाभ
महाविद्यालयीन शिबिरे
➡ जात, उत्पन्न, रहिवासी दाखले वितरित 🎓
🔟 जमीन रूपांतरण (वर्ग २ ते वर्ग १)
➡ सर्व प्रकरणे २ ऑक्टोबरपूर्वी निकाली 🏡
सामाजिक आर्थिक सहाय्य योजना
➡ बेघर, अनाथ, झोपडपट्टीतील व वंचित कुटुंबांना मदत
या सेवा पंधरवड्याचा उद्देश : नागरिकांच्या दारापर्यंत शासन सेवा पोहोचवणे आणि थेट दिलासा देणे.
नागरिकांना आवाहन : आपण सर्वांनी या सेवांचा लाभ अवश्य घ्यावा.
