Take a fresh look at your lifestyle.

सारथी: मराठा समाजाच्या पंखाना बळ देणारी संस्था!

0

राज्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक आर्थिक सक्षमीकरण व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न

मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडून २०१९ पासून छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना

मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या संस्थेचे ‘शाहू विचारांना देऊया गती साधूया सर्वांगीण प्रगती’ या बोधवाक्यानुसार कार्य सुरु शिक्षण, मार्गदर्शन, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता संशोधन आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन या सर्व क्षेत्रांत ‘सारथी’कडून ६३ विविध उपक्रम सन २०२१-२२ ते २०२४-२५ या चार वर्षांमध्ये ८ लाख ३८ हजार ४७७ लाभार्थ्यांचा ‘सारथी’च्या उपक्रमात सहभाग; अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी

संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि मार्गदर्शनावर आतापर्यंत ६४७ कोटींचा खर्च

‘सारथी’तील विद्यार्थ्यांकडून दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये निवड होण्याचा उच्चांक

“सारथी’च्या उपक्रमांच्या माहितीसाठी

https://www.sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या