आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावंतांसाठी- छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती
मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे अर्थात ‘सारथी’ संस्था कार्यरत
आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळविण्याच्या दृष्टीकोनातून छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती योजनेची अंमलबजावणी
या योजनेअंतर्गत सन २०१९ पासून ते २०२३ पर्यंत ३०७८ विद्यार्थी योजनेसाठी पात्र, त्यापैकी ३९४ विद्यार्थ्यांची पीएचडी पूर्ण, १०३ विद्यार्थ्यांना नोकरी प्राप्त

विद्यार्थ्यांना लिखाणाची गोडी लावण्यासाठी निबंध स्पर्धांचे आयोजन
• सारथीतर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा योजनेमध्ये इयत्ता
तिसरी ते पाचवी विद्यार्थी व इयत्ता सहावी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धेचे आयोजन
• या स्पर्धेत सन २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत तीन लाख १६ हजार ५९२ इतके विद्यार्थ्यांचा सहभाग
– त्यापैकी ९४४४ इतक्या विद्यार्थ्यांनी पारितोषिक प्राप्त, स्पर्धांसाठी १७ लाख ९३ हजार रुपयांच्या पारितोषिकांचे वितरण
सारथीच्या उपक्रमांच्या माहितीसाठी सारथीचे संकेतस्थळ
https://www.sarthi-maharashtragov.in/
ला भेट द्यावी.