महाराष्ट्र शासनाची गणेशोत्सव ‘रील स्पर्धा’; भाग घ्या अन् जिंका १लाख रुपये…
सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून यंदा गणेशोत्सवाला रील स्पर्धेच्या माध्यमातून देश-विदेशात नवे आयाम मिळणार आहेत. यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागासाठी २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी आणि रील अपलोड करायचे आहेत. राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास १ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ७५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक ५० हजार रुपये आहे.



