Take a fresh look at your lifestyle.

बालकांचे नियमित लसीकरण करुन त्यांचे विविध आजारांपासून संरक्षण करा

0

बालकांचे विविध आजारापासून संरक्षण व्हावे म्हणून सन 1978 मध्ये विस्तारीत लसीकरण कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात आला. पुढे या कार्यक्रमाचा विस्तार शहरी भागाच्या पलीकडे झाला तेंव्हा 1985 मध्ये त्याचे नाव बदलून सार्वत्रीक लसीकरण कार्यक्रम असे संबोधण्यात आले. सार्वत्रीक लसीकरण कार्यक्रम हा सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांपैकी एक आहे जो वार्षिक 2.67 करोड नवजात बालकांचे आणि 2.9 कोटी गर्भवती महिलांचे सेवा देण्याचे लक्ष आहे. या आरोग्याच्या निर्देशांकामुळे 5 वर्षा खालील लहान बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास अधिक परिणामकारक ठरले आहे.

सार्वत्रीक लसीकरण कार्यक्रमांतर्गत 12 प्रतिबंधात्मक लसी देण्यात येतात. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलीओ, गोवर, रुबेला, क्षय रोग, काविळ, मेंदूज्वर, अतिसार, श्वसनदाह, जे.ई.राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे वरील प्रमाणे सर्व लसी एक वर्षात घेणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाची यशस्वीता म्हणजे दोन महत्वाचे टप्पे आहेत ज्यामुळे 2014 मध्ये पोलीओ आणि 2015 मध्ये माता आणि नवजात बालकांच्या धनुर्वाताच्या आजाराचे निर्मुलन करण्यात आले.

मिशन इंद्रधनुष्य:- मिशन इंद्रधनुष्य हे भारत सरकारचे आरोग्य अभियान आहे. हे 25 डिसेंबर 2014 मध्ये सुरु करण्यात आले. हेतू असा की, या अंतर्गत बालकांचे संपूर्ण लसीकरण 90 टक्के पर्यंत वाढविता येईल आणि ते सन 2022 पर्यंत कायम करता येईल. मिशन इंद्रधनुष्यच्या पहिल्या टप्प्यात 201 जिल्हे घेण्यात आले. यापैकी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, आणि मध्य प्रदेश यातील 82 जिल्हे अंतर्भुत आहेत. आणि जवळपास 50 टक्के लसीकरण न झालेले 201 जिल्हयांची निवड करण्यात आली.मिशन इंद्रधनुष्य ही भारतातील केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक योजना म्हणून ओळखली जाते.

गतिमान मिशन इंद्रधनुष्य:- या कार्यक्रमात जिथे लसीकरणाचे काम कमी आहे आणि ज्या भागात कर्मचाऱ्यांना पोहोचणे ‍कठीण आहे, ज्यांचे लसीकरण झालेले नाही किंवा ज्यांचे अंशत: लसीकरण झालेले आहे. अशा ठिकाणी लसीकरण कार्यक्रम अधिक गतिमान करण्यासाठी केंद्र सरकारने 8 आक्टोबर 2017 रोजी गतिमान मिशन इंद्रधनुष्य सुरु केले. याव्दारे 2 वर्षापर्यंतच्या प्रत्येक बालकांपर्यत आणि सर्व गर्भवती महिलांपर्यंत पोहोचण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे ज्या नियमित लसीरकरण कार्यक्रमांतर्गत परावृत्त राहिल्या आहेत.यामध्ये 2020 एैवजी डिसेंबर 2018 पर्यंत 90 टक्के पेक्षा पूर्ण लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी निवडक जिल्हे आणि शहरांमध्ये लसीकरण कव्हरेज सुधारण्यासाठी विषेश मोहिम राबविण्यावर भर देण्यात आला. 2030 पर्यंत टाळता येणारे बालमृत्यू टाळण्याचे हे निरंतर विकासाचे उद्दीष्ट साध्य करण्याचे हे धोरण आहे. हे 27 राज्यांमधील 272 जिल्हयांमध्ये आणि उत्तर प्रदेश आणि बिहारमधील ब्लॉक स्तरावर लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे, कारण जेथे पोहोचणे कठीण आहे आणि आदिवासी लोकसंख्या आहे.देशातील 554 जिल्हयांमध्ये सहा टप्पयांमध्ये हे मिशन पुर्ण करण्यात येत आहे. ग्राम स्वराज अभियान आणि विस्तारीत ग्राम स्वराज अभियान अंतर्गत महत्वाकांक्षी जिल्हयांमध्ये प्रमुख योजनांपैकी एक म्हणूनही ती ओळखली गेली.राष्ट्रीय कुटुंब पाहणी सर्व्हेक्षण-4 च्या तुलनेत मिशन इंद्रधनुष्यच्या प्रथम दोन टप्पयांमध्ये 6.7 टक्के पूर्ण लसीकरणाचे प्रमाण वाढलेले होते. तर अलिकडे 190 जिल्हयात केलेल्या सर्व्हेक्षणात पाचव्या टप्प्यात 18.5 टक्के पुर्ण लसीकरण कव्हरेजमध्ये वाढ झालेली दिसून आली.

डॉ. श्रीराम गोगुलवार(प्राचार्य)

आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर