Take a fresh look at your lifestyle.

कर्करोग रुग्णालयासाठी मुद्रांक शुल्क माफी; GR जारी

0

मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग उपचार आणि संशोधन केंद्रात १०० खाटांचे नवे रुग्णालय उभारले जाणार आहे. या रुग्णालयाच्या स्थापनेसाठी सरकारने मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

• या निर्णयामुळे गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना परवडणाऱ्या दरात उत्तम कर्करोग उपचार मिळतील.

• संशोधनाला चालना मिळेल आणि महाराष्ट्र देशातील एक मोठे कर्करोग संशोधन केंद्र म्हणून विकसित होईल.

• आरोग्य विभागाचा चेहरामोहरा बदलण्यात या निर्णयाची महत्त्वाची भूमिका राहील.