वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना…
विद्यार्थ्यांना भोजन, निवासासह निर्वाह भत्त्याची होते सोय:- ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळाला नाही, त्यांना शहरात राहून शिक्षण घेता यावे म्हणून ही योजना आहे. यात विद्यार्थ्यांच्या राहण्याचा आणि जेवणाचा खर्च सरकारकडून दिला जातो.
लाभार्थीसाठी मूलभूत पात्रता आणि शैक्षणिक निकष:- विद्यार्थी ओबीसी, व्हीजेएनटी किंवा एसबीसी प्रवर्गातील असावा. तो महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा. विद्यार्थ्यांचे कुटुंब नॉन-क्रिमिलेअरमध्ये असावे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, विद्यार्थी पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेत असावा.
ही कागदपत्रे लागणार:- आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचे बँक पासबुक, शैक्षणिक शुल्क भरल्याची पावती, शाळेचे किंवा कॉलेजचे ओळखपत्र, रेशन कार्ड किंवा रहिवासी पुरावा आदी
अर्ज कुठे आणि कसा कराल:- अर्ज महाज्योती या सरकारी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mahajyoti.org.in) करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करायचा आहे.