Take a fresh look at your lifestyle.

सणासुदीच्या काळात नागरिकांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी शासनाचा टोल-फ्री क्रमांक जारी…

0

राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सणासुदीचे विशेष तपासणी अभियान’ राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी दिली.

नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व दर्जेबाबत तक्रारी असल्यास १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर कळवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.