शेतकऱ्यांसाठी ‘अर्ज एक योजना अनेक’; महाडीबीटी पोर्टल योजना
विविध योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू झाले आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या. लाभार्थ्यांच्या सोयीकरिता महा डीबीटी पोर्टलवर सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे.
त्याद्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून त्यांनी आवश्यक योजनेच्या निगडीत विविध बाबींकरिता अर्ज या पोर्टलवर करायचा आहे.
महाडीबीटी पोर्टलमार्फत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी खालील पोर्टलला भेट द्या.👇
https://mahadbt.maharashtra.gov.in/
महाडीबीटी शेतकरी ॲप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details?
id=com.mahadbtagri
वरील लिंक वरून मोबाईल ॲप डाउनलोड करा किंवा मोबाईल प्लेस्टोर मध्ये “MahaDBT Farmer” असे सर्च करून इन्स्टॉल करा.
हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800