सरकारी योजना दारी; नोकरीची संधी आली!
नवी दिल्ली: ‘पंतप्रधान विकसनशील भारत रोजगार योजना’ १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार असल्याची माहिती श्रम मंत्रालयाने शुक्रवारी दिली. या योजनेत ३.५ कोटी रोजगार देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला आधीच मंजुरी देण्यात आलेली आहे. रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.