मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून अर्थसहाय्य मिळविण्यासाठी संपूर्ण प्रकिया
मुख्यमंत्री सहाय्यता निधी महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत प्रदान करते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून अर्थसहाय्य कसे मिळवावे?
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत आर्थिक मदत मिळवण्यासाठी, अर्जदाराने कक्षाच्या https://cmrf.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून, आवश्यक कागदपत्रांसह भरून, ईमेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयात सादर करावा.
या आजारांसाठी दिले जाते अर्थसहाय्य ?
१). कॉकलियर इम्प्लांट (वय वर्षे २ ते ६) ११) लहान बालकांची शस्त्रक्रिया
२). हृदय प्रत्यारोपण
३) यकृत प्रत्यारोपण
४) किडणी प्रत्यारोपण
५) फुप्फुस प्रत्यारोपण
६) बोन मॅरो प्रत्यारोपण
७) हाताचे प्रत्यारोपण
८) हिप रिप्लेसमेंट
९) कर्करोग शस्त्रक्रिया
१०) रस्ते अपघात
१२) मेंदुचे आजार
१३) हृदयरोग
१४) डायलिसिस
१५) कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन)
१६) अस्थिबंधन
१७) नवजात शिशुंचे आजार
१८) गुडघ्याचे प्रत्यारोपण
१९) बर्न रुग्ण (MLC)
२०) विद्युत अपघात रुग्ण (MLC)
हे आहेत मदत मिळविण्यासाठी निकष
आर्थिक निकष- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. १.६० लाखांपेक्षा कमी असावे.
निवास निकष- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
इतर निकष- रुग्णाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना,आयुष्यमान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालय यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
अर्ज डाउनलोड करा- मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे अधिकृत संकेतस्थळ https://cmrf.maharashtra.gov.in येथे उपलब्ध अर्ज डाउनलोड करा. आवश्यक माहिती भरून, संबंधित कागदपत्रे जोडा.
अर्ज सादर करण्याची पद्धत
ईमेलद्वारे- सर्व कागदपत्रे आणि भरलेला अर्ज PDF स्वरूपात स्कॅन करून aao.cmrf-mh@gov.in या ईमेल पत्त्यावर पाठवा.
टपालाद्वारे- मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री कार्यालय, ७ वा मजला, मंत्रालय, मुख्य इमारत, मुंबई – ४०००३२ सर्व कागदपत्रे आणि अर्ज या पत्त्यावर पाठवा.