संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे ऑनलाईन स्टेट्स तपासा फक्त एका क्लिकवर
संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानाचे स्टेट्स ऑनलाईन स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम खालील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत पोर्टल लिंकवर क्लिक करा किंवा तुमच्या मोबाईल/लॅपटॉपच्या ब्राउझरमध्ये टाइप करा.
https://sas.mahait.org
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाईट उघडल्यानंतर, लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करा व आपला आधार क्रमांक टाकून पुढील योजनेचा लाभ घ्या.
योजनेबाबत संपर्क:
• तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क करा.
• सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधा.
संजय गांधी निराधार अनुदान ही गरजूंना दिलासा देणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेंतर्गत अनुदान मिळालं का? किती आणि केव्हा? हे जाणून घेण्यासाठी घरबसल्या मोबाईलवरून पद्धतीने स्टेट्स तपासता येतं.त्यामुळे आता तुम्हाला तहसील कार्यालयात रांग लावण्याची गरज नाही.