Take a fresh look at your lifestyle.

‘या’ रुग्णालयात आयुष्मान कार्डद्वारे मिळेल मोफत उपचार, जाणून घ्या सविस्तर माहिती

0

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत तूम्ही मोफत उपचार फक्त सरकारी रुग्णालय मध्ये नाही तर खासगी रुग्णालय मध्येही तूम्ही घेऊ शकतात. आयुष्मान भारत योजनेत तुम्ही कोणत्या रुग्णालयातून मोफत उपचार घेऊ शकता हे घरबसल्या चेक करु शकतात. यासाठी ऑनलाइन सोप्पी प्रोसेस आहे.

तुम्हाला सर्वप्रथम आयुष्मान भारत योजनेच्या pmjay.gov.in या वेब साइटवर जावे लागेल. त्यानंतर तिथे “Find Hospital” या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर राज्य, जिल्हा व हॉस्पिटल टाइप करावे लागेल.

यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटलच्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. ज्या आजारावर उपचार घ्यायचा आहे ते सिलेक्ट करा. Empanelment Type मध्ये PMJAY सिलेक्ट करायचे आहे. यानंतर कॅप्चा कोड टाकून सर्च ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला सर्व खासगी हॉस्पिटलची लिस्ट दिसणार आहे. यामध्ये तुम्ही कोण-कोणत्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेऊ शकतात. त्याची माहिती असणार आहे.