विद्यार्थ्यांसाठी आता मोफत वातानुकुलीत अभ्यासिका उपलब्ध
जळगाव जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळा (जी.एस. ग्राउंड) येथे विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधांनी युक्त मोफत अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे. ही सुविधा जिल्हा परिषदेच्या 20% सेस फंडातून उभारण्यात आली असून, सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत आहे.
अभ्यासिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधा
वातानुकुलीत शांत अभ्यासाचे वातावरण
24×7 लाईट सुविधा
60 विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था
स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी
प्रेरणादायी, सुरक्षित व अभ्यासाला पोषक वातावरण
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांचे आवाहन विद्यार्थ्यांनी या अद्वितीय सुविधेचा लाभ घ्यावा आणि अभ्यासाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकावे.
ठिकाण: जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळा, जी.एस. ग्राउंड, जळगाव