भारत स्वत: बनवणार फिफ्थ जनरेशनचं लढाऊ विमान
शस्त्रास्त्राच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा भारताकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. आता भारताने स्वदेशी जेट बनवण्याची तयारी सुरू केली आहे. संरक्षण मंत्रालयाने फायटर प्लेनचे पहिले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याचं नाव उन्नत मध्यम लढाऊ विमान AMCA असं ठेवण्यात आलं आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी DRDO कडे सोवण्यात आली आहे.
याबाबत संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे. भारत स्वदेशी संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी आणि देशांतर्गत मजबूत एअरोस्पेस औद्योगिक पारिस्थितिकी तंत्राला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केला आहे, असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. तर उन्नत मध्यम लढाऊ विमान कार्यक्रम निष्पादन मॉडलला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे.
एअरोनॉटिकल डेव्हल्पमेंट एजन्सी उद्योग भागिदारीच्या माध्यमातून कार्यक्रम क्रियान्वित करण्यासाठी तयार आहे. हे एएमसीए प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी स्वदेशी विशेषज्ञता, क्षमता आणि सामर्थ्याचा उपयोग करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे एअरोस्पेस क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने मैलाचा दगड ठरणार आहे.
एएमसीएच्या प्रोटोटाइपच्या विकासासाठी स्वदेशी तज्ज्ञ आणि उन्नत तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. यात स्टिल्थ तंत्रज्ञान, सुपरक्रूज क्षमता, उन्नत सेन्सर आणि शस्त्र प्रणाली असणार आहे. त्यामुळे देशाच्या शस्त्र सज्जतेला मोठा फायदा होणार आहे. DRDO ने यापूर्वीही असे असंख्य स्वदेशी शस्त्र तयार केले होते. तसेच हे शस्त्र बनवण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरीही दिली आहे.