Take a fresh look at your lifestyle.

गिग व प्लॅटफॉर्म कामगारांनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आवाहन!

0

“गिग” म्हणजे लघुकालीन किंवा तात्पुरते काम. गिग कामगार हे असे लोक असतात जे कायमस्वरूपी नोकरीऐवजी एकावेळी एक किंवा अनेक छोट्या कामांवर काम करतात, हे काम कोणत्याही कंपनीशी दीर्घकालीन कराराशिवाय असून हे काम तासावर, दिवसभरावर, किंवा प्रोजेक्टवर आधारित असते उदाहरण: फ्रीलान्सर लेखक, डिझायनर, फोटोग्राफर, किंवा डिलिव्हरी बॉय वगैरे.

प्लॅटफॉर्म कामगार हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असतात. म्हणजेच ते एखाद्या ऑनलाइन अॅप किंवा वेबसाइटमार्फत ग्राहक आणि सेवादात्याच्या दरम्यान संपर्क साधतात. उदाहरण: Zomato, Swiggy वर डिलिव्हरी करणारे, Uber, ओला चे ड्रायव्हर्स, Urban Company चे टेक्निशियन, Amazon/Flipkart चे कूरियर डिलिव्हरी बॉय यांनी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी ई- श्रम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे.

नोंदणीसाठी आवश्यक गोष्टी:

• आधार कार्ड (Aadhaar Number)

• बँक खाते तपशील (Bank Account Details)

• मोबाईल नंबर (जो आधार कार्डला लिंक असावा)

• कामाचा तपशील (उदा. डिलिव्हरी बॉय, कॅब ड्रायव्हर,फ्रीलान्सर, इ.)

ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया:

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

https://eshram.gov.in