पंडित दिनदयाळ उपाध्याय शिष्यवृत्ती योजना…
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
•शिष्यवृत्ती स्वरूप: विद्यार्थ्यांना दरमहा ठराविक रक्कम
आर्थिक मदत म्हणून दिली जाते.
• कोणते शिक्षणपात्र ? उच्च माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर,
तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांना लागू.
• शिष्यवृत्ती थेट बँक खात्यात (DBT) जमा केली जाते.
• मूलभूत पात्रता: महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
• फक्त नियमित व पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी.
पात्रता:
• विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
• अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त
जाती (VJ), भटक्या जमाती (NT), इतर मागासवर्ग (OBC), किंवा आर्थिक दुर्बल घटक (EWS) यामध्ये यावा.
• विद्यार्थी शासकीय/निमशासकीय/मान्यताप्राप्त खासगी संस्थेत पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असावा.
वार्षिक कुटुंब उत्पन्न मर्यादा:
• SC/ST: कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही.
• OBC/VJ/NT/SBC/EWS: 8 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असावे.
• विद्यार्थी इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेत नसावा.
शिष्यवृत्तीचे लाभ:
• शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती.
• विद्यार्थ्यांच्या वसतिगृह व संगणक शुल्कासाठी आर्थिक मदत.
• अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, कृषी, फार्मसी, कला, वाणिज्य, विज्ञान आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती.
• राष्ट्रीयकृत बँकेत थेट निधी जमा पद्धतीने अनुदान मिळते.
आवश्यक कागदपत्रे :
• आधार कार्ड
• जातीचा दाखला
• उत्पन्न प्रमाणपत्र
• मागील वर्षाचे गुणपत्रक
• कॉलेज किंवा विद्यापीठ प्रवेशाचा दाखला
• बँक पासबुक
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर अर्ज भरावा.
जिल्हा समाज कल्याण कार्यालय / सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग.
MahaDBT हेल्पलाइन नंबर : 022-49150800