पशुसंवर्धन विभागात पशुवैद्यक 3000 पदे भरणार- पशुसंवर्धन मंत्री
राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींनुसार ५००० प्राण्यांमागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक. सध्या राज्यात ३ कोटी ३० लाख पशुधन असून, त्यासाठी पुरेसे पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाहीत. या पार्श्वभूमीवर लवकरच ३००० पशुवैद्यकांची पदे भरणार
पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागात लिपीक संवर्गात एकूण ३६९४ पदे रिक्त आहेत. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना व आकृतीबंधानुसार निरसीत करण्यात आलेल्या लिपीक संवर्गातील अधिक्षक व वरिष्ठ लिपीक या पदांवरील कार्यरत कर्मचा-यांना अतिरिक्त ठरवुन वित्त् विभागाचे दि. 10/09/2001 च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार कार्यवाही करणेबाबतची अट रदद करुन सदर पदांवर कार्यरत कर्मचा-यांना पशुसंवर्धन विभागात कार्यरत ठेवुन त्यांचे पात्रतेनुसार अनुक्रमे प्रशासन अधिकारी (गट-ब), वरिष्ठ सहाय्यक (गट-क), लघुलेखक निम्नश्रेणी (गट-क), लिपीक टंकलेखक (गट-क) व पशुधन पर्यवेक्षक (गट-क) या पदांवर टप्प्याटप्प्याने पदोन्नती करण्यास मंजुरी प्रदान करण्यात यावी ही विनती करण्यात आली आहे.