Take a fresh look at your lifestyle.

मुंबई महानगरपालिका दुय्यम अभियंता परीक्षा पुढे ढकलली, नवी तारीख काय; जाणून घ्या सविस्तर

0

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदांच्या एकूण 690 जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. या भऱती प्रक्रियेची ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभियांत्रिकी संवर्गातील एकूण 690 रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता घेण्यात येणा-या ऑनलाईन परीक्षांचा कालावधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला आहे. यातील, दुय्यम अभियंता (स्थापत्य) या संवर्गाची 9 मार्च 2025 रोजी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.

ही परीक्षा अंदाजे 15 दिवसाच्या आत घेण्याचे नियोजित आहे. त्याअनुषंगाने सदर परीक्षेचा सुधारित दिनांक निश्चित झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर व वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व संबंधित उमेदवारांनी याची कृपया नोंद घ्यावी, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?-मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत दुय्यम आणि सहाय्यक अभियंता या पदांसाठी 25 फेब्रुवारी रोजी सरळसेवा भरती परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. इतकेच नाही तर या प्रकरणात दोन वेगवेगळ्या पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न एकसारखे असणे हे गंभीर असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.