Take a fresh look at your lifestyle.

विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभागात अवसायनातील संस्थांचे कामकाजासाठी अवसायकांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

१) न्यायालयातील निवृत न्यायाधीश व सेवानिवृत्त विधी अधिकारी

२) प्रॅक्टीसिंग अॅडव्होकेटस

३) चार्टर्ड अकौन्टंट, कॉस्ट अकौन्टंट, कंपनी सेक्रेटरी

४) राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, भूविकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँक यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी,

५) सहकार विभागातील सेवानिवृत्त वर्ग -१, वर्ग – २ दर्जाचे अधिकारी आणि प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी दर्जाचे कर्मचारी

६) महसुल विभागातील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी

७) कंपनी लिक्विडेटर म्हणून कामकाज केलेले अनुभवी व्यक्ती.

८) सहकारी संस्थेचे लेखापरिक्षण केले असल्याचे ०५ वर्षाचे अनुभवी प्रमाणित लेखापरिक्षक

अर्जदार व्यक्तींनी खालील प्रमाणे अर्हता धारण केलेली असावी

१) सदर व्यक्तीवर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत.

२) शासकीय सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी असल्यास त्यांची कोणत्याही प्रकारची खातेनिहाय चौकशी चालू नसावी व सेवेत कोणताही उपका ठेवलेला नसावा.

३) वयोमर्यादा ७० वर्षापर्यंत असावी

४) शाररीक व मानसिक आरोग्याच्या दृष्टिने सक्षम असावा.

५) प्रॅक्टीसिंग अॅडव्होकेटस व चार्टर्ड अकौन्टंट, कॉस्ट अकौन्टंट, कंपनी सेक्रेटरी यांना सहकारी संस्थेचे कामकाजाचा ०५ वर्षाचे अनुभव असणे आवश्यक आहे.

६) कोणत्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसावा किंवा कलम ८३ व कलम ८८ च्या चौकशीबाबत जबाबदार नसावा. (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्याखालील नियमांतर्गत अपात्र नसावा.)

७) सदर व्यक्ती कोणत्याही काळया यादी (Black List) मध्ये समाविष्ट केलेला नसावा.

८) सदर व्यक्ती विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग (ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावी.

९) सदर व्यक्ती एकाचवेळी एकाच जिल्ह्यातून अर्ज दाखल करु शकेल.

अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई विभाग पत्ता – विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई, कक्ष क्रं. ३०८, तिसरा मजला, कोकण भवन, बेलापूर सीबीडी यांचे कार्यालयात २७/०२/२०२५ ते १७/०३/२०२५ या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करणेची अंतिम मुदत दिनांक १७/०३/२०२५ पर्यंत राहील. प्राप्त अर्जाची छाननी दिनांक २०/०३/२०२५ रोजी पूर्ण करुन, दिनांक २१/०३/२०२५ पर्यंत प्रारुप नामतालिका प्रसिध्द करणे व दिनांक २५/०३/२०२५ हरकती मागवणे व दि. २७/०३ /२०२५ रोजी हरकतींचा निर्णय करुन दिनांक २८/ ०३ / २०२५ रोजी अंतिम नामतालिका प्रसिध्द करण्यात येईल. याबाबतची जाहीर सूचना या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.