Take a fresh look at your lifestyle.

नागरिकांनो, त्वरित आपले रेशनकार्ड आधार प्रमाणीकरण करा…

0

भारत सरकारच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांसह शिधापत्रिकाधारक कुटुंबांची सरकारच्या निर्देशानुसार ई-केवायसी करून घेण्यात येणार आहे. ई-केवायसी अद्ययावत करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना यापुढे धान्य मिळणार आहे.

गरीब आणि दुर्बल गटातल्या लोकांसाठी अन्नधान्याची सुलभ,

किफायतशीर दरामध्ये उपलब्धतेसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा २०१३ च्या तरतुदी करण्यात आली. स्वस्त धान्य योजनेतील बोगस लाभार्थी शोधून काढण्यासाठी, पात्र नसताना सरकारच्या वितरित होणाऱ्या मोफत धान्य योजनेसह सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत येणाऱ्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानावर असणाऱ्या ई-पॉस मशिनमध्ये शिधापत्रिकाधारक नागरिकांची नोंद ही आधारकार्डवर असणाऱ्या नोंदीनुसार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शिधापत्रिकाधारकांची बँकेप्रमाणे ई-केवायसी करून आधारच्या नोंदीनुसार प्रामाणिकरण करण्यात येणार आहे.

https://mahafood.gov.in/website/marathi/home.apex अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट ओपन झाल्यावर ऑनलाईन सेवा मध्ये “ऑनलाईन रास्तभाव दुकाने” या बॉक्स मध्ये “ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली” या लिंक वर क्लिक करा.

“ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली” या लिंक वर क्लिक केल्यावर एक RCMS ची खालील वेबसाईट ओपन होईल. तुम्ही थेट खालील लिंक वर जाऊ शकता.

अधिकृत वेबसाईट 

https://rcms.mahafood.gov.in/