केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत शासन निर्णय जारी
१.राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर, २०२४ पासून अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्यात येत आहे.

२. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना (NSAP) या योजनेतील लाभार्थ्यांना माहे मार्च, २०२५ पर्यंतचे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनांकरीता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.