शेती – बिगरशेती प्लॉटचा कर आता घरबसल्या भरू शकणार; नागरिकांसाठी ई-चावडी प्रणाली सुरु…

आता ग्राम महसूल अधिकारी(तलाठी) यांच्याकडे पक्षकार, शेतकरी याना आपला शेतसारा किंवा बिगरशेती कर भरण्यासाठी जावे लागणार नाही. ई चावडी प्रणालीतून सिटीजन पोर्टल द्वारे नागरीक आपला शेत जमिनीचा, बिगरशेती प्लॉट चा कर घर बसल्या भरू शकणार. महाराष्ट्र शासनाने डिजिटल प्रणालीतून आणखी एक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली. शासन सुविधेत मानवी हस्तक्षेप कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न.