आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर माहिती
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता अशा प्रेमीयुगुलांच्या सुरक्षेसाठी ‘सेफ हाऊस’ तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘ऑनर किलिंग’च्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आह.
तसेच यासंदर्भात ‘सेफ हाऊस’ तयार करण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून सर्वच पोलीस आयुक्तालये आणि जिल्हा अधीक्षक कार्यालयांना देण्यात आले आहेत.
याशिवाय ‘सेफ हाऊस’मध्ये सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांचा चोवीस तास पहारा देखील असणार आहे. तर महत्वाची बाब म्हणजे या सेफ हाऊसमध्ये राहण्यासाठी नाममात्र शुल्क असून एक महिना ते एका वर्षापर्यंत राहता येणार आहे.