Take a fresh look at your lifestyle.

अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेची अंतिम रिस्पॉन्स शीट उपलब्ध

0

अन्न व औषध प्रशासन अंतर्गत गट-व (अराजपत्रित) /गट-क संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने/ सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन गट-ब (अराजपत्रित)/गट-क परीक्षा-२०२४ राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दि. ३० व ३१ डिसेंबर, २०२४ रोजी पार पडल्या आहेत. सदर परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने उत्तरतालिका दि. ०३ जानेवारी, २०२५ रोजी उमेदवारांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

सदर उत्तरतालिकेबाबत उमेदवारांच्या सुचना/आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पध्दतीने दि. ०३ जानेवारी, २०२५ ते दि. ०७ जानेवारी, २०२५ या कालावधीत नोंदविता येतील. आक्षेपाच्या पृष्ठ्यर्थ त्याबाबतचे कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल.

सदर सुचना/आक्षेप नोंदविण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क रक्कम रु. १००/- प्रति आक्षेप ऑनलाईन पध्दतीने भरणा करणे आवश्यक असेल. उपरोक्त प्रमाणे दि. ०३ जानेवारी, २०२५ ते दि. ०७ जानेवारी, २०२५ या कालावधीत फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वतःच्या लॉगीन आयडीवरुन नोंदविलेले सुचना/आक्षेप विचारात घेतले जातील व त्यानंतरचे सुचना/आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच सुचना/आक्षेप संदर्भात कोणताही पत्रव्यवहार आयुक्त कार्यालयास लेखी अथवा ई-मेल द्वारे स्विकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.