विद्यार्थ्यांनो, आयुष्याला दिशा देणाऱ्या परीक्षेला सामोरे जाताय मग ही तयारी केली का?
1)परीक्षा हॉल तिकीट( रिसीट).
2)कनिष्ठ महाविद्यालय ओळखपत्र . (आय कार्ड)
3) ट्रान्सपरंट रायटिंग पॅड.
4) वेळेचे नियोजन यासाठी मनगटी घड्याळ (स्मार्ट वॉच नसावे)
5) पट्टी, पेन्सिल, कंपास इतर साहित्य . (ट्रान्सपरंट पाऊच)
6)दोन पेन आवश्यक.
7) ट्रान्सपरंट पाणी बॉटल .
8)रिसीट वरील वेळापत्रकाचा विचार करून पेपरच्या वेळेच्या आधी अर्धा तास परीक्षा केंद्रावर हजर राहावे .
9)परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी सुरक्षित वाहन व्यवस्थेचा विचार करावा .
10) शक्यतो मोबाईल घरीच ठेवावा .
11)शक्यतो शूज न वापरता चप्पल वापरावी.
12) खिशात कॉपी सदृश्य काही कागद राहणार नाही याची खात्री करावी .
13)परीक्षेसाठी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा गणवेश असावा.
14) शक्यतो पाकीट (वॉलेट) बरोबर आणणे टाळावे.
15) परीक्षा केंद्रावर आल्यानंतर आपला हॉल क्रमांक व हॉल कुठे आहे? याची खात्री करावी .
16)परीक्षा केंद्रावर आल्यानंतर काही अडीअडचणी निर्माण झाल्यास आपल्या शिक्षकांशी किंवा केंद्र संचालकाशी संपर्क साधावा.
एचएससी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व परीक्षार्थींना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा…
बी.एम. फाउंडेशन, इंडिया