Take a fresh look at your lifestyle.

देशातील पहिले ‘प्री-मॅरेज कौन्सिलिंग सेंटर’ नाशिकला स्थापन होणार

0

महिलांचे लैंगिक शोषण आणि कौटुंबिक हिंसाराच्या घटनांना रोखण्यासाठी जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने ८ मार्चला देशातील पहिले प्री- मॅरेज कौन्सिलिंग सेंटर (विवाहपूर्व समुपदेशन केंद्र ) नाशिकमध्ये सुरु होणार आहे. यानंतर राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अशी केंद्रे स्थापन केली जातील, अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.

शासकीय महिलांचे होणारे लैंगिक शोषण आणि कार्यालयामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा दुर्देवी घटना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांची संयुक्त बैठक शुक्रवारी (७ फेब्रुवारी) आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना रहाटकर म्हणाल्या की, शासकीय कार्यालयांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण केले जाते. मात्र बदनामीच्या महिला यावर आवाज उठवत नाहीत. कौटुंबिक, लैंगिक हिंसाचाराच्या अनेक तक्रारी महिला आयोगाला प्राप्त होत आहेत. यातील ४५ टक्के तक्रारी या कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित आहेत.

असे होईल समुपदेशन:- केंद्राद्वारे कामकाज विवाहापूर्वी मुलगा आणि मुलीला विवाहानंतर कौटुंबिक संबंध कसे टिकवायचे यासाठी माहिती देण्यात येईल. यासाठी प्रशिक्षित समुपदेशकाची नेमणूक करण्यात येईल. यासंबंधी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी चर्चा झाली असून महिला दिनी समपदेशन केंद्राची स्थापना होईल.