BBA, BCA, BBM, CET साठी नोंदणी १८ तारखेपर्यंत करता येणार
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस एमबीए (इंटिग्रेटेड) अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रवेश परीक्षेसाठी १० फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येईल. एलएलबी ५ वर्षे अभ्यासक्रमाच्या सीईटीला १८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सीईटी परीक्षांना १९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याचे संभाव्य वेळापत्रकही नोव्हेंबरमध्येच सीईटी सेलने प्रसिद्ध केले होते. सीईटी वेळेत होऊन प्रवेश प्रक्रियाही वेळेवर पार पडण्याचा सीईटी सेलचा प्रयत्न आहे.