दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
यंदा सवलत गुणांचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागणार
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्रराज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार सन २०२४-२५ पासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाद्वारे आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाइन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व खेळाडू, विद्यार्थी, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले सरकार पोर्टलवर यावर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले आहे.
पोर्टलद्वारे शिक्षण मंडळाला अर्ज पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास सादर करण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे.
खेळाडू विद्यार्थी/जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार अॅपद्वारे यावर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचा आहे.
खेळाडूने जिल्हा क्रीडा कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये, असा अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून स्वीकारला जाऊ नये, असे निर्देश संचालनालयाकडून देण्यात आले आहेत.