Take a fresh look at your lifestyle.

देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन; एल्डरलाईन- 14567

0

भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन; एल्डरलाईन- 14567 सर्व राज्यांत व केंद्र शासित प्रदेशात सुरु करण्यात आली आहे.

या हेल्पलाईन राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये चालविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात एल्डर लाईन 14567 ही सेवा ऑगस्ट २०२१ पासून राबवली जात आहे. या मध्ये कनेक्ट सेंटर व फिल्ड टीम, विविध शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, विविध ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध स्वयंसेवी संस्था, कायदेविषयक सल्लागार, समुपदेशक, स्वयंसेवक आदींच्या सहभागातून व मदतीने कार्यरत आहे. आज अखेर, राज्यभरातून जेष्ठ नागरिकांसाठी चार लाखाहून अधिक कॉल्स आले आहेत. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष प्रकारे मदत हेल्पलाइन ने केली आहे. तसेच तीस हजार हून अधिक प्रकरणे क्षेत्रीय पातळीवर यशस्वीरित्या हाताळली आहेत .

एल्डर लाईन साठी 14567 हा क्रमांक टोल-फ्री आहे. एल्डर लाईन चे कार्य आठवड्याचे सर्व दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजे पर्यंत चालते. संपूर्ण वर्षातील 362 दिवस सुरू असते. फक्त 26 जानेवारी, 15 ऑगस्ट व 2 ऑक्टोबर रोजी ही सेवा बंद असते

एल्डर लाईन द्वारे आरोग्य विषयक जागरूकता, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण, सांस्कृतिक, कला, ज्येष्ठां संबंधी अनुकूल उत्पादने, आणि मनोरंजनाशी संबंधित माहिती दिली जाते. कायदेविषयक (वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर दोन्ही), विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी इ.), आर्थिक, पेन्शन संबंधित सल्ला, आणि सरकारी योजनांची माहिती तसेच चिंता निराकरण, नातेसंबंध व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित भीती निवारण, जीवन व्यवस्थापन, (वेळ, ताण, राग व्यवस्थापन) मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण (मृत्युपत्र बनवण्याचे महत्व इ.),विविध सरकारी यंत्रणा, भागधारक, स्वयंसेवक, सामाजिक संस्था यांचे मदतीने बेघर वृद्ध, अत्याचारग्रस्त ज्येष्ठ नागरिक, किंवा हरवलेल्या व्यक्तींना मदत करण्याचा प्रयत्न व त्यांना परिवाराशी पुनर्मिलन करण्याचे कार्य करते.

एल्डर लाईन 14567 ची टीम कनेक्ट सेंटर च्या माध्यमातून व जनसेवा फौन्डेशन च्या माध्यमातून संस्थापक चेअरमन डॉ. विनोद शहा, मीना शहा , जयदेव नाईक व अन्य विश्वस्त तसेच महाराष्ट्र राज्य एल्डर लाईन 14567 चे प्रकल्प व्यवस्थापक स्मितेश शहा, प्रियांका कांबळे, गजानन इंगळे. स्टेला काकडे, राजेंद्र आहेर यांचे सह सर्व कनेक्ट सेंटर ऑफिसर सातत्याने कार्यरत आहेत. एल्डर लाईन 14567 या हेल्पलाईन आणि तिच्या संपूर्ण भारतातील सेवांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वेबसाईट www.elderline.dosje.gov.in एल्डर लाईन 14567 महाराष्ट्र ने प्रत्यक्ष केली आहे.