Take a fresh look at your lifestyle.

नागरिकांनो, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; आता फक्त ‘या’ 2 नंबरवरूनच बँकेचे कॉल येणार…

0

RBI ने ग्राहकांना व्यवहार आणि मार्केटिंग कॉल करण्यासाठी वित्तीय संस्थांसाठी फक्त 2 फोन नंबरची सिरिज सुरू केली आहे. याचा अर्थ ग्राहकांना रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या या दोन सिरिज नंबरमधूनच बँकिंग कॉल येतील. आरबीआयच्या या निर्णयामुळे मोबाईल युजर्सना फसवणुकीपासून दिलासा मिळणार आहे.

▪️ RBI च्या सूचनेनुसार, बँकांना आता सर्व व्यवहार-संबंधित कॉलसाठी फक्त 1600 ने सुरू होणारे फोन नंबर वापरावे लागतील. जर तुम्ही कोणताही बँकिंग व्यवहार केला असेल आणि त्यासाठी तुम्हाला कॉल आला असेल तर तो फक्त 1600 सिरिजपासून सुरू होणाऱ्या क्रमांकांवरून येईल.

▪️ एसएमएसद्वारे माहितीसाठी, बँकांना फक्त 140 सिरिजपासून सुरू होणारे क्रमांक वापरावे लागतील. बँकिंग मार्केटिंग आणि एसएमएससाठी आरबीआयने हा क्रमांक वापरण्याचा निर्णय घेतला आहे. 140 सिरिजपासून सुरू होणाऱ्या क्रमांकांवरून, तुम्हाला पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड किंवा विमा यासारख्या सेवांसाठी कॉल येऊ शकतात.