विद्यार्थ्यांनो, विद्यार्थ्यांनो ST चालवीण्याचा बॅच बिल्ला लवकर काढून घ्या! ST महामंडळात निघणार लवकरच मोठी भरती
एसटी महामंडळाच्या वाहक पदासाठी प्रादेशीक परिवहन कार्यालयाच्यावतीने वाहकाचा परवाना ज्याचा बॅच दहावी उत्तीर्ण अशी पात्रता होती. वाहकाच्या भरतीसाठी जिल्हयातील अनेक इच्छुकांनी प्रादेशीक परिवहन कार्यालयात बॅच काढून घेतले होते. एसटी महामंडळाच्यावतीने यावेळी विविध पदांच्या १३ हजार ७७० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.त्यामध्ये वाहन तथा चालकांची पदे आहेत.
यावेळी वाहक चालक अशी दोन पदांची वेगवेगळी भरती घेता दोन्हीसाठी वाहक तथा चालक अशी भरती घेतली जात असल्याने ज्यांच्याकडे वाहकाचा परवाना बॅच अवजड वाहन चालविण्याचा परवाना असेल अशांनाच या भरतीत संधी दिली जाणार आहे. त्यामुळे जिल्हयात वाहक पदासाठी वाहकाचा परवाना काढणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.अवजड वाहनाचा परवाना नसल्याने असे इच्छुक भरती प्रक्रियेपासून वंचित राहणार आहेत. एसटी महामंडळाची सर्वात मोठी भरती प्रक्रिया आहे.परंतु अवजड वाहन चालविण्याचा परवाना,वाहकाचा परवाना दहावी पास असणाऱ्यांनाच संधी मिळणार असल्याने अनेक पदे रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.